राहुलजी, तुम्हाला राफेल करार मी शिकवते; आठ वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राफेल कराराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता आठ वर्षांच्या मुलीने राफेलबाबत राहुल गांधींना उद्देशून एक व्हिडिओ केला आहे. यामध्ये राफेल विमानाचा फरक तिने एका पेन्सिल बॉक्सच्या मदतीने समजावून सांगितला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राफेलवरून राहुल गांधी करत असलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला जात आहे. त्यामध्ये राहुल गांधींना राफेलमधलं काय कळतं? अशा शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर आता याच मुद्यावरून हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये तिने सांगितले, की ''राफेल मुद्यावर मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते. हे राहुल गांधींचे राफेल विमान आहे, ते आतून पूर्णपणे रिकामे आहे. याची किंमत 720 कोटी आहे. तर हे मोदींचे विमान अत्याधुनिक शस्त्रांसह आहे. याची किंमत 1600 कोटी रुपये आहे. ही राफेलची बेसिक किंमत आहे. तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असणाऱ्या राफेलची किंमत वाढली आहे''. 

दरम्यान, हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटवरून त्या मुलीचे आभार मानले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ''हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. मी या लहान मुलीचे विशेष धन्यवाद करते, की तिने राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणात रुची दाखवली. माझ्या शुभेच्छा आहेत, की ती लढाऊ विमानाची एक प्रशिक्षित वैमानिक बनावी''. 

Web Title: A Girl Explains Rafale Deal with Pencil Box to Rahul Gandhi In Video