JNU attack : जेएनयुत राडा करणारी 'ती' तरूणी आहे तरी कोण?

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

दोन मुलांसोबत एक मुलगी दिसतीय. तिने चेक्सचा शर्ट घातलाय. पहिल्यांदा बघितल्यावर लक्षात येत नाही की ही मुलगी आहे, पण नीट लक्ष देऊन बघितले तर दोन मुलांसोबत आलेली, तोंडाला बांधलेली व हातात रॉड घेऊन आलेली ही मुलगी आहे.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी (ता. 5) संध्याकाळी झालेल्या हाणामारीचा निषेध देशभरातून होतोय. अज्ञात लोकांनी जेएनयुच्या हॉस्टेलमध्ये येऊन विद्यार्थीनी-विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे मारेकरी तोंडाला फडकी बांधून, तोंड लपवून आले होते. त्यामुळे कोणाचीही ओळख पटू शकली नाही. या हल्लेखोरांचा एक फोटोही व्हायरल झालाय आणि त्यात विशेष म्हणजे एक मुलगीही हातात रोड घेऊन मारहण करताना दिसत आहे. कोण आहे ही मुलगी?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन मुलांसोबत एक मुलगी दिसतीय. तिने चेक्सचा शर्ट घातलाय. पहिल्यांदा बघितल्यावर लक्षात येत नाही की ही मुलगी आहे, पण नीट लक्ष देऊन बघितले तर दोन मुलांसोबत आलेली, तोंडाला बांधलेली व हातात रॉड घेऊन आलेली ही मुलगी आहे. तिचं नाव कोमल शर्मा आहे अशी चर्चा सर्वत्र आहे. दिल्ली विद्यापीठात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करते अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तो फोटो आणि व्हिडिओ बघितलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी तिला ओळखले असल्याचे सांगितले. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

यावर ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची अध्यक्षा कंवलप्रीत कौरने ट्विट करून फोटोत चेक्सचे शर्ट घातलेल्या मुलीला मी ओळखत असल्याचा दावा केला आहे. तसेच तिच्या पोस्टमध्ये तिने त्या मुलीचे नावही लिहिले आहे. दरम्यान कोमल शर्माचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करण्यात आलेले आहेत.  

JNU attack : उद्धवजी काश्मीर मुक्तच्या घोषणा आपण मुंबईत सहन करणार का? : फडणवीस (व्हिडिओ)

जेएनयुनधील दोन्ही विचारधारांचे विद्यार्थी हल्ला कोणी केला हे एकमेकांवर ढकलत आहेत. हे तोंड बांधून आलेले लोक नक्की कोण, ते आत कसे आले, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. तर जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आली आहे. या मारहाणीत आईशी जबरदस्त जखमी झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl found in the videos in JNU Violence