व्हिडिओ लिक करण्याच्या धमकीमुळे तरुणीची आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

जुना प्रियकराने व्हिडिओ लिक करण्याची धमकी दिल्याने दक्षिण दिल्लीतील रुपानगर परिसरात 21 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी होती.

नवी दिल्ली - जुन्या प्रियकराने व्हिडिओ लिक करण्याची धमकी दिल्याने दक्षिण दिल्लीतील रुपानगर परिसरात 21 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी होती.

आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात तिने आपल्या आत्महत्येला जुना प्रियकर जबाबदार असल्याचे लिहिले आहे. "घरच्यांना सोडून माझ्यासोबत आली नाही, तर तुझे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन लिक करेल' अशी धमकी दिल्याचा दावा तरुणीने चिठ्ठीत केला आहे. तिने मोडल टाऊन पोलिस स्थानकात तिच्या जुन्या प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. मात्र त्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी तरुणीने (8 एप्रिल) तक्रार केली होती, त्याचदिवशी तिने आत्महत्या केली आहे. तरुणीचा जुना प्रियकर हा पाटना येथील असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Web Title: Girl hangs self as lover threatens to leak private videos