झोमॅटोवरून ऑर्डर करताय? तर...

झोमॅटोवरून ऑर्डर करताय? तर...

गुडगाव : सध्या मोबाइलवरून अॅपच्या माध्यमातून जेवण मागवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑनलाइन जेवणाच्या ऑर्डरबाबत झोमॅटो कंपनी सध्या आघाडीवर आहे. मात्र, झोमॅटोवरून ऑर्डर करणाऱ्या एका विद्यार्थीनीला चांगलीच महागात पडली आहे. तिने ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांतच तिच्या खात्यातून तब्बल 80 हजार रुपये लुटण्यात आले.

संबंधित विद्यार्थीनी ही हरियाणातील रहिवासी आहे. तिने आपल्या मोबाईलवर जेवणाची ऑर्डर केली. या ऑर्डरसाठी तिने 190 रुपये पेटीएमच्या माध्यमातून दिले होते. मात्र, जेवण चांगले नसल्याने तिने डिलिव्हरी बॉयला ते जेवण परत नेण्यास सांगितले. परंतु, संबंधित डिलिव्हरी बॉयने त्यास नकार दिला. त्यानंतर गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेऊन तक्रार करण्यास सांगितले. संबंधित विद्यार्थीनीने गुगलवरील नंबर पाहून त्यावर फोन केला.

फोनवरून समोरच्या व्यक्तीने तिला बोलण्यात अडकवून तिच्याकडून तिच्या बँक खात्यासह एटीएम कार्डची संपूर्ण माहिती घेतली. तसेच लवकरच पैसे खात्यात जमा करण्यात येतील, असे सांगितले. बँकेची ही सर्व माहिती दिल्यानंतर लगेचच तिच्या खात्यातून 80 हजार रुपये लुटण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com