प्रेमावरून युवतीला केले अर्धनग्न अन्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

एका युवतीने दुसऱया जातीमधील युवकाशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून तिला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली.

भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवतीने दुसऱया जातीमधील युवकाशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून तिला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. मारहाण करत असतानाचा गावामधून धिंड काढण्यात आली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणीच्या कुटुंबीयांचांच समावेश होता. एक मिनिट 42 सेंकदाचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनाले वाचा फुटली. एका 19 वर्षीय आदिवासी युवतीचे दुसऱया जातीमधील युवकासोबत प्रेमसंबंध होते. याबाबत युवतीच्या कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर त्यांनी तिला धमकावले. यानंतर युवती प्रियकरासोबत पळून गेली होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेऊन घरी आणले. लाकडी दांडक्याने नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मारहाण करत धिंड काढली. मारहाण होत असताना युवती मोठमोठ्याने रडताना दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक विपूल श्रीवास्तव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl paraded beaten over inter caste affair in madhya pradesh