धक्कादायक : ओवेसी यांच्या उपस्थितीत, 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; व्हिडिओ पाहाच!

टीम ई-सकाळ
Thursday, 20 February 2020

पोलिसांनी त्या मुलीला व्यासपीठावरून बाजूला नेले. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बेंगळुरू : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थित झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. एका माथेफिरू मुलीने व्यासपीठावर जाऊन ही घोषणाबाजी केली. तिला संयोजकांनी आणि स्वतः ओवेसी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्या मुलीला व्यासपीठावरून बाजूला नेले. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
बेंगळुरूमध्ये सध्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आज, या आंदोलनाला एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हजेरी लावली होती. सभा संपण्याला काही वेळ बाकी असताना, एक माथेफिरू तरुणी व्यासपीठावर आली तिनं माईकचा ताबा घेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी स्वतः ओवेसी आणि संयोजनकांनी त्या मुलीला अडविण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिनं तो दिला नाही. माईक काढून घेतल्यानंतर पुढं येत तिनं पुन्हा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तिच्या घोषणाबाजीनंतर उपस्थितांनी हिंदुस्तान जिंदाबाद जिंदाबादच्या घोषणा देऊन तिला प्रत्युत्तर दिलं. तिनं पुन्हा पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्याला व्यासपीठावरून खाली घेऊन गेले. 

आणखी वाचा - वारिस पठाण नरमले, मनसेचं जोरदार प्रत्युत्तर 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल
व्यासपीठावरून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मुलीचे नाव अमुल्या असल्याचं स्पष्ट झालंय. तिच्या या घोषणाबाजीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, तिच्यावर कलम 124ए नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. बेंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली असून, पोलिस तिची चौकशी करत आहेत. पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर तिला कोर्टात हजर केले जाणार आहे. अमुल्याविषयी मात्र अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl raised slogans Pakistan zindabad Bengaluru anti-CAA-NRC rally