धक्कादायक! वडिलांसमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

आरोपी फरार

यातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी वैयक्तिकरित्या याप्रकरणावर लक्ष देत आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे किशनगंजचे पोलिस अधीक्षक कुमार आशिष यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीच्या वडिलांसमोरच हा प्रकार घडला. या घटनेमुळे राज्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घडली.

याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की एका 19 वर्षीय तरुणीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तिने सांगितले, की गावातील 6 जणांनी मंगळवारी रात्री उशीरा घराचे दार ठोठावले होते. त्यावेळी त्यांनी आमच्याकडे तहान लागली असल्याने पाण्याची मागणी केली. जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मला शेतात नेऊन तेथे बंदिस्त करण्यात आले आणि एका झाडाला बांधले. या सहा जणांनी  माझ्या वडिलांसमोर बलात्कार केला, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान, याप्रकरणातील आरोपींनी मला आणि माझ्या वडिलांना पोलिसांत तक्रार देऊ नये, यासाठी धमकी दिली, असेही पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी फरार

यातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी वैयक्तिकरित्या याप्रकरणावर लक्ष देत आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे किशनगंजचे पोलिस अधीक्षक कुमार आशिष यांनी सांगितले. 

Web Title: Girl raped by 6 men in Bihar father forced to watch