अल्पवयीन मुलीवर तेलंगणमध्ये बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

त्याने शनिवारी तिला करीमनगर गावाजवळील कोठापल्ली गावातील शाळेतून घेतले. त्यानंतर एका किल्ल्यात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिस उपनिरीक्षक ए. नरेश रेड्डी यांनी सांगितले

करीमनगर (तेलंगण) - येथे एका ट्रॅक्‍टर चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज येथे सांगितले.

पीडित मुलीला हा ट्रॅक्‍टरचालक ओळखत होता. त्याने शनिवारी तिला करीमनगर गावाजवळील कोठापल्ली गावातील शाळेतून घेतले. त्यानंतर एका किल्ल्यात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिस उपनिरीक्षक ए. नरेश रेड्डी यांनी सांगितले. या घटनेनंतर आरोपीने पीडित मुलीला पुन्हा शाळेत सोडले. पीडित मुलगी ही अनुसूचित जातीची आहे. या घटनेबाबत पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: girl raped in telangana