फेसबुकवरील प्रेम पडले महागात, लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

राहुलने स्वत: अविवाहीत असल्याचे सांगितले व तरुणीला लग्नाचे वचन देत शारीरिक संबध ठेवले.

बरेली : सोशल मीडियावरील ओळखीतून झालेल्या प्रेमात एका तरुणीची फसवणूक झाली असून समोरील व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यासंबधित तरुणीने पोलीसांत तक्रार देखील दाखल केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बरेली पोलिस ठाण्याच्या अंतर्गत फूलबाग परिसरात राहणा-या युवतीची अडीच वर्षांपूर्वी फेसबुकद्वारे कडियापुरा गावातील राहुल गंगवार या तरुणाशी ओळख झाली. दरम्यान तरुणीने दिलेल्या माहितीनुसार राहुलने तिला रिक्वेस्ट पाठविली होती. तसेच तो आपल्याच समाजातील आणि जातीचा असल्याने मी रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्याचे तिने सांगितले. 

ज्यानंतर पुढील संवादातून एकमेंकाचे नंबर त्यांनी घेतले. त्यानंतर राहुलने स्वत: अविवाहीत असल्याचे सांगितले व तरुणीला लग्नाचे वचन देत शारीरिक संबध ठेवले. अखेर तरुणीने लग्नाबद्दल विचारले असता तो टाळाटाळ करु लागला. तसेच तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील देऊ लागला. अखेर हताश तरुणीने संबधित प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर तिचे नातेवाईक तिला घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले. दरम्यान पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरुन युवकावर गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl sexually exploited by marital lust via facebook