तीन वर्षात तिला 34 वेळा चावले साप

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सिरमूर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील एका अठरा वर्षाच्या मुलीला गेल्या तीन वर्षात तब्बल 34 वेळा साप चावला आहे. मात्र या साऱ्या प्रकारातून ही मुलगी जिवंत राहिली आहे.

सिरमूर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील एका अठरा वर्षाच्या मुलीला गेल्या तीन वर्षात तब्बल 34 वेळा साप चावला आहे. मात्र या साऱ्या प्रकारातून ही मुलगी जिवंत राहिली आहे.

मनिषा नावाच्या मुलीला गेल्या तीन वर्षात 34 वेळा साप चावला. मात्र तरीही ज्या ज्या वेळी तिला साप दिसतो त्या त्या वेळी ती सापाकडे आकर्षित होते. "मला गेल्या तीन वर्षात 30 पेक्षा अधिक वेळा साप चावले. गावातील एका नदीच्या शेजारी मला पहिल्यांदा साप चावला. मात्र त्यानंतर दोन वर्षे मला एकदाही साप चावला नाही. शाळेत असल्यावर मला बऱ्याचदा साप चावले. कधी कधी तर मला एकाच दिवशी दोन-तीन वेळा साप चावले. माझा देवाशी काहीतरी संबंध असल्याचे ज्योतिषी म्हणतात', अशी माहिती मनिषाने बोलताना दिली.

विविध ठिकाणच्या रुग्णालयातील आणि वैद्यकीय केंद्रातील माहितीप्रमाणे मनिषाला 18 फेब्रुवारी रोजी 34 व्या वेळा साप चावल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर तिला डॉ. वाय. एस. परमार वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय निरीक्षक डॉ. के. के. परशर म्हणाले, "साप चावल्याची लक्षणे आढळून आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला चावलेला साप हा बिनविषारी असावा. येथील बहुतेक साप हे बिनविषारी आहेत.'

सापांचा अभ्यास करणाऱ्या स्थानिकानेही तिला चावलेले साप हे विषारी नसल्याचे म्हटले आहे. "तिला कोणता साप चावला हे मला खरोखरच माहिती नाही. मात्र आम्ही घोड्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्यांना सापांचे विष देत असतो. याच कारणामुळे (तिला आधी विषारी साप चावला असेल) अनेकदा साप चावूनही ती वाचली असेल', अशा प्रतिक्रिया हिमाचल सरकारच्या वनविभागातील अधिकारी डॉ. रोहित यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Girl survives 34 snakebites over 3 years