'गर्लफ्रेंड'च्या आनंदासाठी तो झाला चोर!

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

हुबळी - ‘गर्लफ्रेंड‘च्या आनंदासाठी वेगवेगळ्या वस्तू चोरत चोरत एक तरुण पक्का चोर ठरल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एका दुकानातून चोरलेल्या डेबिट कार्डद्वारे मद्य खरेदी करताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

हुबळी - ‘गर्लफ्रेंड‘च्या आनंदासाठी वेगवेगळ्या वस्तू चोरत चोरत एक तरुण पक्का चोर ठरल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एका दुकानातून चोरलेल्या डेबिट कार्डद्वारे मद्य खरेदी करताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मूळ देवनागिरी येथील रहिवासी असलेला विरेश अंगादी (वय 27) नुकताच धारवडला स्थलांतरित झाला होता. त्याला चोरी करण्याची सवय लागली होती. शॉपिंग मॉल, रुग्णालय आणि उपहारगृहांच्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारींच्या खिडक्यांच्या काचा कटरने कापून तो आतील वस्तू चोरत होता. बहुतेकवेळा त्याला मोटारीतील लॅपटॉप, बॅगा, रोख रक्कम, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू मिळत होत्या. यु-ट्युबवरील व्हिडिओ पाहून त्याने अशा चोऱ्यांमध्ये प्राविण्य मिळविले होते. सोमवारी चोरलेल्या डेबिट कार्डद्वारे मद्य खरेदी केल्यानंतर बस स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 12 लॅपटॉप, मोबाईल फोन्स, डेबिट कार्डस्‌, हार्ड डिस्क आणि इतर वस्तू मिळाल्या. त्या सर्वांचे मूल्य 4 लाख 76 हजार रुपये होते. आपल्या ‘गर्लफ्रेंड‘ला आनंद देण्यासाठी चोरी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त पांडुरंग राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. विरेश शहर आणि परिसरातील 15 चोरीच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 'Girlfriend' joy, he was a thief!

टॅग्स