प्रियकराच्या पत्नीला अडकवायला गेली अन् हिच लटकली...

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण, काही कारणामुळे दोघांचा विवाह होऊ शकला नाही. प्रियकराच्या पत्नीला त्रास देण्याच्या उद्देशाने प्रेयसीने फेसबुकवर बनावट खाते उघडून प्रियकराच्या पत्नीची छायाचित्रे अपलोड केली. पण, पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रेयसीच अडकली.

लखनौः दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण, काही कारणामुळे दोघांचा विवाह होऊ शकला नाही. प्रियकराच्या पत्नीला त्रास देण्याच्या उद्देशाने प्रेयसीने फेसबुकवर बनावट खाते उघडून प्रियकराच्या पत्नीची छायाचित्रे अपलोड केली. पण, पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रेयसीच अडकली.

उत्तर प्रदेशातील पन्नूगंज गावामधील सुनिल कुमारचे एका युवतीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. परंतु, सनिलच्या घरच्यांनी सुनिलचा विवाह दुसऱया मुलीसोबत लावून दिला. सुनिल सोबत विवाह न झाल्यामुळे प्रेयसी नैराष्यात गेली होती. परंतु, यामध्ये सुनिलची काही चूक नसल्याचे तिला समजले.

प्रेयसीला सुनिल पुन्हा तिच्या आयुष्यात हवा होता. परंतु, सुनिलला किंचीतही त्रास होऊ द्यायचा नाही, असे तिने ठरवले. यामुळे प्रेयसीने सुनिलच्या पत्नीची छायाचित्रे मिळवली. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर तिने बनावट खाते उघडले. या खात्यावर सुनिलच्या पत्नीच्या छायाचित्रांमध्ये छेडछाड करून अपलोड केली. अश्लिल छायाचित्रे झाल्यामुळे व्हायरल होऊ लागली. याबाबतची माहिती सुनिलला मिळाली. सुनिलने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सुनिलची प्रेयसी जाळ्यात अडकली.

दरम्यान, पोलिसांनी सुनिलच्या प्रेयसीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girlfriend made this plan to take revenge from lover in up