तब्बल 44 हजार तरुणी तेजस्वीच्या प्रेमात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना व्हॉट्‌ऍपवरून लग्नाचे प्रस्ताव
पाटणा - लालूप्रसाद यादव यांचे कनिष्ठ चिरंजीव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (वय 26) यांच्या लोकप्रियतेची प्रचिती नुकतीच आली. तेजस्वी यादव हे अविवाहित असून, त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा तब्बल 44 हजार तरुणींनी व्यक्त केली आहे.

खराब रस्त्यांसंदर्भात तक्रार करता येणे शक्‍य व्हावे, यासाठी तेजस्वी यांनी जनतेसाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक सुरू केला. मात्र या क्रमांकावर त्यांना लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. प्रिया, कांचन, मनीषा, अनुपमा व देविका अशा 44 हजार विवाहेच्छूक मुलींनी तेजस्वी यांना व्हॉट्‌सऍपवरून लग्नाची मागणी घातली आहे. विशेष म्हणजे यात बिहारच्या समाजकल्याण विभागाच्या मंत्र्यांनीही लग्नाची तयारी दाखविली आहे. या क्रमांकावर एकूण 47 हजार संदेश आले आहेत. त्यापैकी केवळ तीन हजार तक्रारी रस्त्यासंदर्भात आहेत. 44 हजार संदेश हे वैयक्तिक असून, ते सर्व तेजस्वी यांना लग्नाची मागणी घालणारे आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रस्तावांमध्ये संबंधित मुलींनी त्यांची व्यक्तिगत माहिती दिली असून यात वजन, उंची, वर्णही नमूद केला आहे. तेजस्वी यांचा हा क्रमांक खासगी असल्याचा गैरसमज या मुलींचा झाल्यानेच त्यांनी त्यावर स्वतःची माहिती दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ठरवून विवाह करणार - तेजस्वी यादव
विवाहासाठी युवतींकडून भरघोस प्रस्ताव आल्याने तेजस्वीही अवाक झाले. ते गमतीने म्हणाले की, माझे जर आधीच लग्न झाले असते तर अशा सर्व प्रस्तावांमुळे मी अडचणीत सापडलो असतो. मी अद्याप अविवाहित आहे हे चांगलेच आहे. मात्र नंतर ते म्हणाले, ""ठरवून विवाह करण्यास माझे प्राधान्य असेल.''

Web Title: girls love to tejaswi yadav