विद्यार्थिनींना अर्धनग्न करून फोटो काढणारी शिक्षिका निलंबित

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - सोनभद्रा जिल्ह्यातील अनपारा कॉलनीतील मुलींच्या माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षिकेने होमवर्क पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थिनींना अर्धनग्न अवस्थेत मैदानाला प्रदक्षिणा मारण्याची शिक्षा दिली आणि या मुलींचे अर्धनग्न अवस्थेचे मोबाईलमध्ये फोटो काढले. या प्रकाराबद्दल संबंधित शिक्षीकेला निलंबित करण्यात आले आहे.

शाळेतील मीना सिंह या संस्कृत शिक्षिकेने संस्कृतीचे काही श्‍लोक पाठ करून येण्यास सांगितले होते. मात्र शनिवारी वर्गातील 15 मुलींना श्‍लोक म्हणता आले नाहीत. त्यानंतर शिक्षिकेने सुरूवातीला कोंबडा होण्याची आणि नंतर स्कर्ट काढून शाळेच्या मैदानात फेरी मारण्याची शिक्षा सुनावली. शिक्षिकेने अशाच अवस्थेत विद्यार्थिनींचे छायाचित्रे काढली आणि व्हिडिओ चित्रीकरणही केले. जर होमवर्क पूर्ण केले नाही, तर हा व्हिडिओ समोर आणण्याची धमकीही दिली.

हा प्रकार विद्यार्थीनींच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी सोनभद्रचे जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांच्याकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबित केले आहे आणि विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा पौगंडावस्थेतील मुलींविरूद्धचा भयंकर गुन्हा असल्याचे म्हणत संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी महिला चळवळीच्या कार्यकर्त्या शाश्‍वती घोष यांनी केली आहे.

Web Title: Girls stripped, paraded in seminude condition in Sonbhadra school