बलात्कारानंतर मुलीची आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

हरियानातील मेवातमधून 17 वर्षांच्या एका मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर त्या मुलीने आत्महत्या केली आहे.

चंडीगड - हरियानातील मेवातमधून 17 वर्षांच्या एका मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीने आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. नूह जिल्ह्यातून मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांकडे केली होती. एका निर्मनुष्य जागी ही मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली. ही मुलगी घरात एकटी असताना दोन मोटारसायकली आणि एका मोटारीतून आलेल्यांनी तिला पळवून नेले होते. नंतर या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Girl's suicide after rape