GitHub Layoffs : मायक्रोसॉफ्टची कंपनी गिटहबमधील भारतातील सर्वच इंजीनियर्सना नारळ! 'इतक्या' जणांची गेली नोकरी | GitHub fires its entire engineering team in India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GitHub fires its entire engineering team in India

GitHub Layoffs : मायक्रोसॉफ्टची कंपनी गिटहबमधील भारतातील सर्वच इंजीनियर्सना नारळ! 'इतक्या' जणांची गेली नोकरी

GitHub Layoffs : मायक्रोसॉफ्टची कंपनी गिटहब मध्ये मोठ्या प्रमाणत नोकरकपात करण्यात आली आहे. कंपनीने त्यांची भारतातील संपूर्ण इंजीनियरिंग टीमला नोकरीहून काढून टाकले आहे. आईएएनएनने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेनंतर गिटहबची सर्वात मोठी इंजिनियरींग टीम भारतात होती.

आता कंपनीने भारतातील या सर्व कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे.

GitHub ने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने हा निर्णय 'Reorganisation Plan' अंतर्गत घेण्यात आला आहे. गिटहबने फेब्रुवारीमध्येच मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचे संकेत दिले होते. कंपनीने सांगितले की खूप कठीण पण आवश्यक निर्णय आहे.

आम्ही हा निर्णय कमी कालावधीसाठीच्या गरजा पूर्ण करणे आणि आगामी काळासाठी योग्य जागी आर्थिक गुंतवणूकीसाठी घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, गिटहबने फेब्रुवारी महिन्यातच घोषणा केली होती की ते त्यांच्या एकूण वर्कफोर्सच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना या तिमाहीच्या शेवटापर्यंत कमी करेल.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नोकर कपातीच्या आधी कंपनीमध्ये एकूण ३,००० कर्मचारी कार्यरत होते. आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये गिटहबचे सीआओ थॉमस डोमके (GitHub CEO Thomas Dohmke)यांनी म्हटले होते की, बिझनेस चालवण्याकरिता योग्य वाढ होणे गरजेचे असते. कंपनीच्या वाढीसाठी हा कठीण निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच सीईओ म्हणाले होते की कंपनी आगामी काळात १८ जानेवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नवीन हायरिंग करणार नाही. ओपन सोर्स डेव्हलपर प्लॅटफॉर्म गिटहबचे जगभरात १०० मिलीयन पेक्षा जास्त सदस्य आहेत. भारतात एकूण १० मिलीयनपेक्षा जास्त डेव्हलपर्स आहेत. अनेरेकिनंतर भारतात कंपनीचे सर्वाधिक अॅक्टीव यूजर्स आहेत.

टॅग्स :Microsoft