
Atiq Ahmed : 'माझा मुलाला जसं त्यानं संपवलं, तसंच अतिकला संपवा'; उमेशच्या आईची अश्रू ढाळत मागणी
Umesh Pal Murder Case: उमेश पाल अपहरण प्रकरणात (Umesh Pal Kidnapping Case) तब्बल 17 वर्षांनंतर आज (मंगळवार) निकाल देण्याची वेळ आलीये.
त्यासाठी माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, उमेश पाल यांची आई शांती देवी (Shanti Devi) आणि त्यांची पत्नी जया पाल (Jaya Pal) यांनी माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीये.
अतिक-अश्रफला फाशीची शिक्षा न मिळाल्यास आमच्या कुटुंबाला धोका राहील, असं पत्नी आणि आईचं म्हणणं आहे. उमेशची पत्नी जया पाल यांनी सांगितलं की, मी स्वतः या घटनेची प्रत्यक्षदर्शी आहे. पुढचा नंबर माझा असू शकतो. तर, दुसरीकडं उमेश पाल यांची आई शांती देवी म्हणाल्या, 'शिक्षा झाल्यावर काय होईल? माझ्या मुलाला ज्या पद्धतीनं मारण्यात आलं, त्याचप्रमाणं अतिक, अशरफ आणि असद यांचं एन्काउंटर व्हायला हवा, तरच माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल.'
उमेश पाल अपहरणप्रकरणी अतिक अहमदसह 10 आरोपींना आज (मंगळवार) शिक्षा सुनावण्यात येणार असली, तरी उमेश पालच्या कुटुंबातील एकही सदस्य न्यायालयात हजर राहणार नाही. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडू दिलेलं नाही. उमेश पाल यांची आई शांती पाल आणि त्यांची पत्नी जया पाल यांनी सांगितलं की, 'प्रशासनानं परवानगी दिली आणि पोलिसांनी सुरक्षा दिली तर आम्ही नक्की कोर्टात हजर राहू.'