आम्हाला पाच वर्षे देऊन बघा : केजरीवाल

काँग्रेस, भाजपने केवळ हिमाचलला लुटण्याचे काम केले
arvind kejariwal
arvind kejariwalsakal

मंडी :आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या साथीत बुधवारी हिमाचल प्रदेशातील रणधुमाळीचा धडाका सुरु केला. काँग्रेसला ३०, भाजपला १७ वर्षे दिल्यानंतर आता आम्हाला पाच वर्षे संधी द्या आणि खरा विकास म्हणजे काय हे बघा, अशा शब्दांत त्यांनी हिमाचलच्या जनतेला साद घातली.

केजरीवाल-मान यांनी रोडशोचे आयोजन केले होते. केजरीवाल आपल्या खास शैलीत म्हणाले की, काँग्रेस, भाजपने केवळ हिमाचलला लुटण्याचे काम केले. आम्हाला संधी दिल्यानंतर पाच वर्षांत तुमचे समाधान झाले नाही तर तुम्ही आम्हाला बदलू शकता. राजकारण कसे करायचे हे आम्हाला माहीत नाही, पण शाळा कशा उघडायच्या, भ्रष्टाचार कसा संपवायचा हे नक्कीच ठाऊक आहे. दिल्लीत विकास घडवीत असलेला आप आता पंजाबमध्ये हे करून दाखवेल.

मंडी हा हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा मतदारसंघ आहे. केजरीवाल-मान यांचे एक तास उशिरा आगमन झाले. त्यावेळी रणरणते ऊन असूनही पक्ष कार्यकर्ते आणि प्रेक्षक वाट बघत थांबले होते. व्हिक्टोरिया ब्रीजपासून रोडशो सुरु झाला. सेरी मंच येथील जाहीर सभेने त्याची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com