Jain Wefare Board : अल्पसंख्याक आयोगांमध्ये जैन समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्या; स्मृती इराणी यांच्याकडे मागणी

Smriti Irani
Smriti Irani esakal

नवी दिल्लीः जैन समाज अल्पसंख्याक आहे, परंतु त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे जैन कल्याण मंडळाची स्थापना करण्याची मागणी होत आहे. अल्पसंख्याक आयोगांमध्ये जैन कल्याण मंडळाच्या स्थापनेसाठी जैन समाजाच्या वतीने प्रतिनिधित्व मिळण्यासाठी अॅड. शशा जैन यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहले आहे.

अॅड. शशा जैन यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.भारतातील प्रत्येक राज्यात जैन कल्याण मंडळाची स्थापना करावी आणि राज्यातल्या अल्पसंख्याक आयोगामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भातील एक निवेदन जैन समाजाच्या वतीने केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांना देण्यात आले आहे. सरकार आमच्या मागण्यांवर विचार करेल, असं शशा जैन यांनी म्हटलं आहे.

Smriti Irani
Bhagat Singh-Ambedkar: दिल्लीच्या शाळांमध्ये आता भगतसिंग, आंबेडकरांचे लागणार फोटो; महापालिकेचा मोठा निर्णय

जैन समाज हा भारतातील प्राचीन समुदायांपैकी एक आहे, ज्यात समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहास आहे. जैन समाजातील सांस्कृतिक वारसा, मंदिरे आणि यात्रेकरूंना जगभरातील लोक भेट देतात. मात्र, योग्य संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजनांच्या अभावामुळे या स्थळांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यात जैन कल्याण मंडळाच्या स्थापनेच्या तातडीच्या गरज असल्याचे शशा जैन यांनी म्हटले आहे.

Smriti Irani
Weather Update : मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता; ४ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com