थेट नियुक्‍त्यांमध्ये आरक्षण द्या - उदीत राज

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

खासगी क्षेत्रातून थेट भरण्यात येणाऱ्या सचिवस्तरीय दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षण देण्याची मागणी भाजपचे खासदार उदीत राज यांनी आज केली आहे.

नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातून थेट भरण्यात येणाऱ्या सचिवस्तरीय दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षण देण्याची मागणी भाजपचे खासदार उदीत राज यांनी आज केली आहे.

तसेच, कंत्राटीपद्धतीने भरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जागांवर आरक्षण लागू करावे, असे उदीत राज यांनी म्हटले आहे. वायव्य दिल्लीचे भाजपचे खासदार असलेल्या उदीत राज यांनी सचिवस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्‍त्यांमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. ऍट्रॉसिटीच्या मुद्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे दलित समाजात संतापाची लाट असून, न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ पदांसाठी आरक्षण लागू करण्याची मागणीही उदीत राज यांनी केली आहे. 

Web Title: Give reservation in direct nomination says Uddiat Raj