
लशीचा फॉर्म्युला अन्य कंपन्यांनाही द्या; केजरीवाल
नवी दिल्ली - भारतासारख्या (India) मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी आवश्यक लसीकरणाची (Vaccination) गरज केवळ दोन कंपन्या भागवू शकणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही लसीचा फॉर्म्युला (Formula) हा इतर औषधनिर्मिती कंपन्यांनाही सांगण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी , अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. वाढीव लसनिर्मिती सुरू झाली तरी दोन्ही मूळ कंपन्यांना रॉयल्टी म्हणून उत्पन्नाचा एक भाग देण्याचा पर्याय अमलात आणला जाऊ शकतो, असेही त्यांनी सुचवले आहे. (Give the vaccine formula to other companies as well Arvind Kejriwal)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे, की साऱ्या देशाला लसीचा पुरवठा करणे दोन कंपन्यांच्या दृष्टीने अशक्य आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लशींना मान्यता मिळाली आहे.
आगामी ३ महिन्यात दिल्लीतील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे हे लक्ष्य दिल्ली सरकारने ठेवले आहे, असे सांगून केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे, की सरकार लवकरच दररोज तीन लाख नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी केंद्राकडून आवश्यक तेवढ्या लशीचा पुरवठा दिल्लीला होणे गरजेचे आहे. सध्या दिल्लीला लशींची कमतरता जाणवत असल्याने उत्पादन युद्धपातळीवर सुरू करावे अशी केंद्राला विनंती करत आहे.
हेही वाचा: नागरिकांनो! आता तुम्हाला हवी ती लस घेऊ शकता
टर्मिनल-२ बंद
कोरोना स्थितीमुळे प्रवाशांची संख्या घटल्याने दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल- २ या महिन्याच्या १७ तारखेपासून बंद ठेवण्यात येणार आहे. या टर्मिनलवरील सर्व उड्डाणे टर्मिनल-३ वरुन होणार आहेत.
सिसोदिया-रिजिजू ट्विटर वॉर
लसीची निर्यात करण्याच्या केंद्राच्या धोरणावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी टीका केली. त्यावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी भारताने यापूर्वी केलेल्या मदतीचा परिणाम म्हणूनच इतर देश संकटाच्या काळात मदतीला धावून आले, असे प्रत्युत्तर दिले. देशवासीयांना, युवापिढीला मरण्यासाठी सोडून साडेसहा कोटी लसी विदेशात विकून आलेले सरकार, असे सिसोदिया यांनी ट्विट केले. यामागे या सरकारची कोणती मजबुरी होती? असाही सवालही केला. त्यालाही रिजीजू यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येक देश संकटांचा आणि आपत्तींचा मुकाबला करतो, तुम्ही एका महत्त्वाच्या पदावर बसलेले आहात. तेव्हा असे अप्रिय बोलणे तुम्ही टाळले पाहिजे, असेही रिजीजू यांनी सुनावले.
Web Title: Give The Vaccine Formula To Other Companies As Well Arvind
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..