ब्युटी विथ ब्रेन; भारतातील ग्लॅमरस महिला राजकारणी

टीम ई-सकाळ
Tuesday, 26 January 2021

अतिशय सुंदर असलेल्या दिव्या स्पंदना फिल्मी दुनियेत राम्या म्हणून ओळखल्या जातात. त्या दक्षिण भारतातील एक प्रख्यात अभिनेत्री असून कन्नड, तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

पुणे : सौंदर्य आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बऱ्याचजणींनी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सचा क्राउनही पटकावला आहे. त्यानंतर अनेकींनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपापला ठसा उमटवला आहे. राजकीय क्षेत्रातही अशाच अनेक सौंदर्यवती आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याच्या नव्हे, तर राजकारणातील योगदानामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकीय क्षेत्रातील 'ब्युटी विथ ब्रेन' अशा स्त्रियांबद्दल जाणून घेऊया.   

१. नुसरत जहाँ

May be an image of 1 person and standing
नुसरत जहाँ एक अत्यंत ग्लॅमरस भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि राजकीय नेत्या आहेत. बंगाली सिनेमात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९९० रोजी कोलकाता येथे झाला होता. भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आणि २०१९ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी बशीरहाट येथून निवडणूक लढविली. नुसरत जहाँ यांनी २०११ मध्ये राज चक्रवर्ती यांच्या ‘शॉटरू’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्यांचा पुढचा चित्रपट खोका 420 होता. २०१९ मध्ये त्यांनी निखिल जैनबरोबर लग्नगाठ बांधली.

२. दिव्या स्पंदना 

May be an image of 1 person and standing
अतिशय सुंदर असलेल्या दिव्या स्पंदना फिल्मी दुनियेत राम्या म्हणून ओळखल्या जातात. त्या दक्षिण भारतातील एक प्रख्यात अभिनेत्री असून कन्नड, तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९८२ रोजी बेंगलुरुमध्ये झाला होता. २००८ मध्ये रिलीज झालेला 'मुसंजैमातू' (कन्नड चित्रपट) हा त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट प्रचंड गाजला. २०१३ मध्ये कर्नाटकातील मांड्या मतदारसंघात पोटनिवडणूक जिंकून राम्या यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला.

'माझा पद्म अनाथांना अर्पण'; 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर सिंधुताईंनी दिली पहिली प्रतिक्रिया!

३. अलका लांबा

May be a close-up of 1 person
अलका लांबा यादेखील धडाडी नेतृत्वासोबत त्यांच्या सौंदर्यामुळे ओळखल्या जातात. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्या कॉंग्रेस विद्यार्थी संघ (एनएसयूआय)मध्ये दाखल झाल्या. तरुण-तरुणींच्या सबलीकरणाच्या उद्देशाने त्यांनी ‘गो इंडिया फाउंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. २० वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये चांदनी चौकातून त्यांची दिल्ली विधानसभेवर निवड झाली.

४. अंगूरलता डेका

May be an image of 1 person
अंगूरलता डेका यांचा मॉडेल, अभिनेत्री ते राजकीय नेता असा प्रवास राहिला आहे. त्या भारतीय जनता पक्षाचा एक सुंदर चेहरा आहेत. त्यांनी बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनही केलं आहे. २०१६ मध्ये त्यांनी आसाममधील बतद्रोबा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या.

Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण' जाहीर!​ 

५. डिंपल यादव

May be an image of 1 person and standing
अत्यंत सभ्य आणि आपल्या साडी ड्रेसिंगमुळे यांची विशेष ओळख आहे. डिंपल यादव यांनी कनौज मतदारसंघातून दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली असून त्या समाजवादी पक्षाच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

६. गुल पनाग

May be a close-up of 1 person
ब्युटी क्वीन गुल पनाग यांनीही अभिनेत्री ते राजकीय नेता असा प्रवास केला आहे. २००३ मध्ये 'धूप' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. २०१४ मध्ये चंदीगडमधून आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती.

राष्ट्रपतींनी नेताजींचा नव्हे, तर अभिनेत्याच्या पोर्ट्रेटचं केलं अनावरण? खरं काय वाचा

७. ऐश्वर्या महादेव

May be an image of 1 person
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ऐश्वर्या महादेव यांच्याकडे काँग्रेस प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या त्या सरचिटणीसही आहेत.

८. लावण्या बल्लाळ

May be a close-up of 1 person
लावण्या या पूर्वी रेडिओ जॉकी म्हणून रेडिओ मिरचीमध्ये कार्यरत होत्या. सध्या त्या काँग्रेसच्या माध्यम सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Glamorous women politicians in India