परदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांच्या यादीत भारत पाचवा

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

दावोस - येथे सोमवारपासून 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या 48व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. यावेळी मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत भारताचा विकास आणि देशातील गुंतवणुकीच्या संधी याबात चर्चा केली. दरम्यान, जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून, या यादीत जपानला मागे टाकत भारताने पाचवे स्थान पटकावले आहे. 

'प्राईसवॉटर हाऊस कुपर्स' या संस्थेने हा अहवाल तयार केला असून, यासाठी जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते नोंदविण्यात आली. 

या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे. 

भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक देश आहे, याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मोदी करत आहे. यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 'मेक इन इंडिया'चा प्रसार केला जाणार आहे. मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. 
 
Web Title: Global CEOs see India as 5th most attractive investment destination