Go Back Modi and Go Back Sadist Modi hashtag trending on twitter and social media
Go Back Modi and Go Back Sadist Modi hashtag trending on twitter and social media

#GoBackModi : दक्षिणेत मोदींना जोरदार विरोध

चेन्नई : काही तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडूतील तिरुपुर येथे काही योजना व जनतेशी बातचीत कार्यक्रमानिमित्त गेले असता 'गो बॅक मोदी' (#GoBackModi) अशाप्रकारचा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला आहे. मोदींच्या विरोधात असलेली तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथील जनता हा हॅशटॅग आणि 'गो बॅक सदिस्ट मोदी' (#GoBackSadistModi) हा हॅशटॅग सध्या ट्विटर, फेसबुक व इंन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

याला विरोध म्हणून भाजप च्या तमिळनाडूतील कार्यरत आयटी विभागाने 'टी एन वेलकम्स् मोदी' (#TNwelcomesModi) व 'डीएमके फेल्स्' (#DMKfails) असे हॅशटॅग सुरु केले आहेत. 'गो बॅक मोदी'चा ट्रेंड द्रविडीयन पक्ष व समर्थक यांनी सुरु केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com