भाजपचे माजी मंत्री दिलीप परुळेकरांना गोवा खंडपीठाचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

गोवा : पर्वरी येथील सेरुला कोमुनिदादमधील 599 चौ. मी. बेकायदा भूखंड बळकावल्याप्रकरणी भाजपचे नेते व माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली खटला सुरू करण्याचा आदेश देत दणका दिला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरील आरोप रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे परुळेकर यांना न्यायालयासमोर सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज हा आदेश दिला. भ्रष्टाचाराचा आरोप रद्द झाल्याने हा खटला आता पणजीतील विशेष न्यायालयाकडून म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाकडे वर्ग केला आहे. या आरोपपत्रातील संशयित असलेले माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह इतर दोघांना येत्या 6 ऑगस्टला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश खंडपीठाने दिला.

Web Title: goa bench starts case bjp former minister dilip parulekar