श्रीपाद नाईक यांच्या अपमानास्पद वागणुकीवर भाजप प्रदेश गप्प 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले आहे. तरीही अद्याप भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्कही होत नाही. 

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये बुधवारी सायंकाळी इफ्फीचा समारोप झाला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे केंद्रीय पर्यटन मंत्री जे. के. आल्फोन्स यांच्यासमवेत बसले होते. श्रीपाद नाईक हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, असे सूत्रसंचालकांकडून सांगण्यात आले. पण एकाही पुरस्कारावेळी त्यांना व्यासपीठावर बोलाविले नाही. राज्यपाल मृदुला सिन्हा, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनाही व्यासपीठावर बोलाविण्यात आले. पण केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरून समाजमाध्यमात जोरदार टीका होऊ लागली आहे. श्रीपाद नाईक यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी ट्‌विटरवरून माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना धारेवर धरले आहे. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना शिष्टाचार शिकवा, असा सल्ला दिला आहे.

त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही संदेश पाठविला आहे. एवढे सगळे होऊन 24 तास ओलांडले तरीही भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने यावर काहीही मत व्यक्त केले नाही. राज्याचा खासदार आणि केंद्रीय मंत्र्याला एक नव्हे तर दोनवेळा अशी अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे, तरीही भाजप प्रदेशाध्यक्ष कुठे गायब आहेत हे त्यांनाच माहीत. त्यांना याविषयी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल "ऑऊट ऑफ कव्हरेज एरिया' आहे.

Web Title: goa bjp keep silence on shripad naik humiliation