'गोवा माहिती तंत्रज्ञानाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणार'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

गोवा माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर महसूल मंत्री रोहन खंवटे आणि मोहनदास पै उपस्थित होते. 

पणजी : गोव्याची ओळख सर्वत्र केवळ पर्याटनासाठीच करून दिली जाते, ही गोवेकरांची शोकांतिका आहे. पण वास्तव पाहिले असता देशाला विविध क्षेत्रात नाव करणारी अनेक व्यक्‍तिमत्त्वे गोव्याने दिली आहेत. सरकारने घोषित केलेले माहिती तंत्रज्ञान धोरण (आयटी पॉलिसी) राज्यातील शिक्षितांना राज्यात नोकऱ्या मिळवून देणारे असल्याने संधीच्या शोधात आता गोवेकर राज्याबाहेर जाणार नाहीत. येत्या काही दिवसात गोव्याला जगपातळीवर माहिती तंत्रज्ञानाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणार असल्याचे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्‍त केले. 

गोवा माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर महसूल मंत्री रोहन खंवटे आणि मोहनदास पै उपस्थित होते. 

2000 सालापासून राज्यातील सर्व व्यवहार डिजिटल व्हावेत म्हणून मी प्रयत्न करीत आहे. शाळा आणि महाविद्यालयातील मुलांना केलेले लॅपटॉप वितरण हासुद्धा याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून अशाप्रकारे लॅपटॉप वितरण करणारे गोवा देशातील पहिले राज्य आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याची कुवत गोव्यात आहे आणि भविष्यकाळात ते आम्ही सिद्ध करून दाखवू, असेही मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले. 

स्टार्ट अप धोरणाशी निगडित असणारा सर्व कारभार ऑनलाइन व्हावा म्हणून यावेळी स्टार्टअप पोर्टलचे उद्‌घाटनही करण्यात आले. 

Web Title: Goa CM Manohar Parrikar statement about IT industry