मनोहर पर्रीकर रुग्णालयात; 48 तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना एन्डोस्कोपी करण्यासाठी आज (शनिवार) सायंकाळी उशिरा गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलविण्यात आले आहे. पुढील ४८ तास ते सतत वैद्यकीय निरीक्षणाखाली असतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली असल्याची चर्चा होती. त्यांच्या फुफ्फुसांत पाणी झाले व नंतर ते बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रसारित झाली होती. याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी बैठक घेतल्याचे सांगण्यात आले होते.

आज त्यांना माजी मंत्री रमेश तवडकर‌ व त्याआधी नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई भेटले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला व त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून आजारी आहेत. स्वादुपिंडाच्या आजारावर मुंबई, न्यूयॉर्क, दिल्लीत त्यांनी उपचार घेतले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa CM Manohar Parrikar taken to Goa Medical College for upper GI endoscopy