गोव्यात काँग्रेस जाणार न्यायालयात

Girish Chodankar
Girish Chodankar

पणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाच्या कायदा विभागाशी सल्लामसलत करून ही याचिका लवकर सादर करण्याची सुचना केली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
चोडणकर यांनी सांगितले, की आम्ही याचिका सादर करणार आहोत. त्याची पूर्वतयारी सुरु आहे. पक्षांतरबंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विविध निवाडे दिले आहेत. त्याचे संदर्भ देत याचिका तयार करण्यात येत आहे. पक्षांतर केल्यानंतर सोपटे व शिरोडकर यांना लाभाचे पद सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आल्याने आम्हाला दाद मागण्यासाठी अधिक सोपे झाले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही याचिका सादर केली आहे. त्यांनी सत्ताधारी गटात असतानाही याचिका सादर करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र त्यांची याचिका केवळ सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ राजीनामे मंजूर करण्यास आक्षेपावर बेतलेली आहे. तो आक्षेप न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारा नाही. त्यामुळे आम्ही वेगळी याचिका सादर करणार आहोत. 

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येत्या 48 तासात राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा जो नागरीकांनी इशारा दिला आहे त्याला कॉंग्रेसचा पाठींबा असेल असे त्यांनी स्पष्ट केले. 

मगोची आणखीन खेळी 
दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवा अशी मागणी करतानाच मगोने भाजपने मुख्यमंत्रीपद सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपवल्यास मांद्रे व शिरोड्यातून मगोचे उमेदवार विधानसभा पोट निवडणूक लढवणार नाहीत असा प्रस्ताव आज दिला. मगोचे कार्याध्यक्ष ऍड नारायण सावंत आणि उपाध्यक्ष ऍड रत्नकांत म्हार्दोळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा प्रस्ताव दिला. यावेळी त्यांनी मगोच्या याचिकेचे समर्थन करताना मगोच्या आजवरच्या 126 आमदारांपैकी 29 आमदार पक्ष सोडून गेल्याची आकडेवारी सादर केली. राजकारणाचे व्यापारीकरण थांबवण्यासाठी ही याचिका असल्याचे त्यांनी सांगितले. 

मगोचा भाजपवर वार 
किनाऱ्यावरील कचरा प्रकरणातून भाजपने मगोवर वार केल्यावर मगोनेही न्यायालयीन याचिकेतून भाजपवरवार केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आमदार फ्रांसिस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर हे विधानसभेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास अडचण होऊ नये यासाठी कॉंग्रेसचे दोन आमदार फोडल्याचा मगोचा आरोप आहे. सत्ताधारी आघाडीतील धुसफूस कुठवर पोचली हे यावरून दिसते. 

आघाडीत बिघाडी 
गेल्या आठवड्यात महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी जाहिरपणे वित्त खात्यात फाईल्स फिरत राहत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या नाराजीची दखल अद्याप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून घेतली गेली नसल्याचे दिसते. काल व आजही खंवटे मंत्रालयात आले नव्हते. 

लोबो काय करणार 
उपसभापती मायकल लोबो यांनी किनारी स्वच्छतेचे कंत्राट पर्यटन खात्याऐवजी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवावी अशी मागणी करून राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. मात्र पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी याविरोधात दंड थोपटल्याने हा विषय अनिर्णित राहणार आहे. त्यामुळे आतीा लोबो काय करतील याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com