गोव्यात भाजपला धक्का; मुख्यमंत्री पराभूत

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

पणजी : गोव्यात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होत असल्याने गोवा भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे.

मुख्यमंत्री पार्सेकर यांना धोबीपछाड देत काँग्रेसचे दयानंद सोपते यांनी मांद्रे मतदारासंघात 3500 मतांनी पराभूत केले. 'जायंट किलर' सोपते हे गोवा काँग्रेसचे हीरो ठरले आहेत. काँग्रेस सकाळपासून आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. सकाळी दहा वाजता 8 जागांवर काँग्रेस आघाडीवर होता, तर भाजपचे 6 उमेदवार आघाडीवर होते. 

इतर राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपने सुरवातीपासून मुसंडी मारल्याचे चित्र असले तरी गोव्यात मात्र या पक्षाला धक्का बसला आहे. 

सकाळी मतमोजणीला सुरवात झाली तेव्हा गोव्यात काँग्रेसचे उमेदवार 3 जागांवर आघाडीवर होते. गोव्यात भाजप, आपला तोपर्यंत एकाही जागेवर आघाडी मिळालेलनी नव्हती. काँग्रेसचे राणे, सिल्वेरा, जेनिफर, सोपते असे 4 उमेदवार आघाडीवर होते. त्यापैकी सोपते जायंट किलर ठरले. 

Web Title: Goa election BJP Laxmikant Parsekar Manohar Parrikar