गोव्यात मतदानाला पावसाचा फटका; पर्रीकर लढताहेत पोटनिवडणूक

अवित बगळे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पणजी मतदारसंघात 17.67%, तर वाळपई मतदारसंघात 20.24% मतदान झाले.

पणजी (गोवा) : गोव्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून याचा फटका विधानसभा पोटनिवडणुकीतील मतदानाला बसत आहे.

लोक आधीच गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतले आहेत. त्यात पावसाची सर पडली आहे. गणेशोत्सव आणि पावसाचा परिणाम सकाळच्या मतदानावर दिसून आला. पणजी आणि वाळपई मतदारसंघात पहिल्या 2 तासात 19% मतदान झाले. पणजी मतदारसंघात 17.67%, तर वाळपई मतदारसंघात 20.24% मतदान झाले. पणजी येथील 8 क्रमांकच्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री तथा भाजपचे पणजीतील उमेदवार मनोहर पर्रीकर यांनी मतदान केले. 

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक उमेदवारांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. यामध्ये पणजीचे काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार आनंद शिरोडकर,अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा तर, वाळपईत भाजप उमेदवार विश्वजीत राणे आणि काँग्रेस उमेदवार रॉय नाईक यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार दुसऱ्या मतदार संघातील मतदार आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

 

Web Title: goa elections bypoll news voting rains manohar parrikar