गोव्यात भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

अवित बगळे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पणजीमध्ये ३४.६५.% तर वाळपईमध्ये ४०.०२ % मतदान झाले होते.

पणजी (गोवा) : विधानसभा पोट निवडणूक शांततेत होईल असे वाटत असतानाच पणजी मयदारसंघातील टोंक-करंजाळे येथील मतदान केंद्र क्रमांक २८ वर मतदार मार्गदर्शन स्टॉल लावण्यावरुन भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि नगरसेविका शीतल नाईक यांनी जबरदस्तीने काँग्रेसच्या स्टॉल वरील मतदार याद्या घेऊन जाताना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने याप्रकरणी कुंकळ्येकर आणि नाईक यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील नोंदवली आहे.

या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कॉंग्रेसचे उमेदवार कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंच या पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर हे उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान गणेशोत्सवाचा परिणाम मतदानावर स्पष्टपणे दिसून येत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत पणजी आणि वाळपई मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीने पन्नाशी गाठली नव्हती. पणजीमध्ये ३४.६५.% तर वाळपईमध्ये ४०.०२ % मतदान झाले होते. पणजीमधील मतदार गणेशोत्सवासाठी गावी गेल्याने मतदान कमी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

    Web Title: goa elections news bjp congress clashes voting