पणजी, वाळपई पोटनिवडणुकीचा उद्या निकाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पणजी (गोवा) : पणजी, वाळपई  पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार असून, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून 10 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पणजी (गोवा) : पणजी, वाळपई  पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार असून, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून 10 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पणजीच्या जुने गोमेकॉ इमारतीत ही मतमोजणी होणार आहे. पहिल्या मजल्यावर वाळपई आणि तळमजल्यावर पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी होईल. बुधवारी या दोन्ही मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशिन्स सीलबंद करून पोलिस बंदोबस्तात जुने गोमेकॉ इमारतीत ठेवण्यात आले आहेत. पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी तीन फेर्‍यांमध्ये होणार असून यासाठी प्रत्येकी 14 टेबल मांडले जातील. मतमोजणीच्या कामासाठी 100 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली  आहे. 

पणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. याशिवाय गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर व अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने सार्‍यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

वाळपईतून भाजपतर्फे विश्‍वजीत राणे व काँग्रेसचे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहें.

Web Title: goa elections news results on monday bjp congress