गोवा सरकारची महिला गटांना आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पणजी : गोवा सरकार महिला मंडळे आणि महिलांचे स्वयंसहाय्य गट यांना एकरकमी ३० हजार रुपया्ंची मदत देणारी योजना ऑगस्टमध्ये लागू करेल, अशी घोषणा महिला व बालकल्याणमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
ते म्हणाले, अंगणवाड्यांच्या जागेसाठी ग्रामीण भागात अडीच हजार रुपयांपर्यतचे भाडे सरकार देईल.यंदा १०० अंगणवाड्यांच्या इमारतीची दुरूस्त हाती घेतली आहे. अंगणवाड्यांत येणाऱ्या मुलांना खासगी विद्यालयांच्या धर्तीवर सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न अाहे.

ईलर्निंग प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. अपवाद घरमधील मुलांना शिकवण्यासाठी बालभवनमधील शिक्षकांची मदत घेता येईल पण अपनाघरमधील नियुक्ती त्यांना शिक्षा वाटता कामा नये. दृष्टीकोनातील बदल आवश्यक आहे. महिला आयोग सक्षम करण्यात येत असून महिला आगोगाच्या कायद्यातही बदल केला जाणार आहे. त्यासाठी नियुक्त न्यायाधीशांचा समावेश असलेली समिती सरकारला शिफारस करणार आहे. विधानसभेच्या पुढील अधिवेशनापर्यत हे काम करण्याचा प्रयत्न आहे. जगात कोठारांत उपयोगी पडेल असे शिक्षण आयटीआयमधून दिले जाणार आहे. नवे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत.

अन्न व औषध प्रशासन खाते स्वतंत्र खाते आहे. त्यांच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. विधानसभेत काल मडगावमध्ये रसायनांमघ्ये केळी पिकवण्याचा विषय़ आला तेव्हा या खात्याने त्या केळींचे नमूने घेतले. म्हापशातील य़ार्डातील फळांचे नमूने घेतले.त्यात वावगे काही सापडले नाही. ते खाते आपले काम करतच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: goa government helps to mahila gat