गोवा सरकार पक्षपाती असल्याची 'आप'ची तक्रार

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली: गोवा सरकार पक्षपातीपणा करीत असून, तेथील अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे मंगळवारी केली. "आप'चे चिन्ह "झाडू'शी साम्य असलेल्या चिन्हाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.

गोव्यातील अनेक अधिकारी तेथील सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करीत असल्याचा आरोप "आप'चे समन्वयक दिलीप पांडे यांनी केला. "आप'च्या कार्यकर्त्यांना धमकी देण्याच्या व मारहाण करण्याच्या सात घटना गेल्या तीन महिन्यांत घडल्या असे नमूद करून संबंधितांवर काहीही कारवाई झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गोव्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिराती काढून टाकण्यासाठी पोलिसांनी आमच्या जाहिरात संस्थेवर दबाव आणला होता. पूर्वपरवानगी घेऊनही आमच्या सभा फिरत्या पथकाने थांबविल्या, अशी तक्रार "आप'चे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी आयोगाकडे केली आहे.

Web Title: That the Goa government's partial AAP report