गोव्यात 50 मायक्रॉनखालील प्लॅस्टिकवर बंदी

यूएनआय
मंगळवार, 30 मे 2017

यापूर्वी राज्यात 40 मायक्रॉन खालील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही चालू आहे.

पणजी : गोवा राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या खरेदी व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. प्लॅस्टिक कचऱ्याच्या विघटनाच्या प्रश्‍नावर तोडगा म्हणून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राजधानी पणजी येथे पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यासंदर्भात म्हणाले, या बंदीची अंमलबजावणी त्वरीत करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच अंमलबजावणीत यश आल्यावर नंतर दंडाची रक्कम 5000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे.

महामार्गावरील कचरा उचलण्यासाठी स्टेशन चालू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. यापूर्वी राज्यात 40 मायक्रॉन खालील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही चालू आहे.

Web Title: goa govt bans plastic below 50 microns