'त्या' साडे सहा लाखांबद्‌दलची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, बांबोळी येथील तिजोरीतील सुमारे साडे सहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार लवकरच उघडकीस येणार आहे. हे पैसे इस्पितळाच्या तिजोरीतून 2016 सालापासून गायब आहेत. हे पैसे हडप करण्यास जबाबदार असणाऱ्यांना शोधण्यासाठी राज्य आरोग्य संचालनालयाकडून कडक चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.

या चौकशीअंती दोषी सापडल्यास त्याच्यावर कायदात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज (सोमवार) एका कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

म्हादई नदीतील पाणी कर्नाटकला देण्याबाबतच्या मुद्‌द्‌याबाबत सांगताना ते म्हणाले, काँग्रेसच्या हाती गेली अनेक वर्षे सत्ता नसल्याने काँग्रेसचे नेते हल्ली अस्वस्थ होऊन अर्थहीन बरळत आहेत. भाजप सरकारला जनतेने निवडलेले असून म्हादईबाबत योग्य तो निर्णय घेण्यास भाजप समर्थ आहे. राज्यातील खाणव्यवसाय सुरू करण्याच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे असल्याचेही मंत्री राणे यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: goa Health Minister Vishwajit Rane talking about Corruption