गोवा निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ‘साम’च्या मुलाखतीत माहिती

Dr-Pramod-Sawant
Dr-Pramod-Sawant

पणजी - गोव्याची बहुतांश मदार ही आयातीवर होती. मात्र, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांनी पाहिलेली दूरगामी विकासाची स्वप्न सत्यात उतरवत गोवा आता आयातीवर अवलंबून न राहता निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटात देशासाठी आदर्श ठरणाऱ्या उपाययोजना गोव्यात राबवताना डॉ. सावंत यांनी स्वत: हातात इंजेक्शन आणि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून रुग्णांची सेवा केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'साम टीव्ही'ला दिलेल्या खास मुलाखतीत डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या प्रगतीचा, गोव्यात राबवलेल्या अनेक यशस्वी उपक्रमांचा आढावा तर मांडलाच, पण त्याचसोबत, गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी टार्गेटेड प्रोग्रामचा आराखडाही मांडला. ते म्हणाले, गोव्यात लॉकडाउनसह अनेक उपाययोजना सचोटीने राबवल्या. मात्र लॉकडाउनमुळे अर्थचक्र रुतून पडू नये म्हणून कृषीसह अन्य उद्योगही काळजी घेत राबवण्यात आले. गोव्यात सुमारे ४ लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले. सोबतच, शासन-प्रशासन आणि अनुशासन या त्रिसूत्रीने गोवा 'शून्य कोरोना रुग्ण' हा टप्पा पार करू शकला. मंत्रिपदाचा कसलाही अनुभव नसताना, थेट मुख्यमंत्रिपदाची धुरा पैलू शकलो आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलो, असे ते म्हणाले.

दिवंगत मनोहर पर्रिकरांनी दाखवलेला विश्वास, त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि त्यांचे संस्कार यामुळेच हे शक्य झाले, असे सावंत म्हणाले.  पर्यटनावर अर्थकारण अवंलबून असलेल्या गोव्यात कृषी, उद्योग आणि शिक्षणाचीही महाद्वारं खुली होणार आहेत. खाणी सुरू करून राज्याच्या तिजोरीत मोठी भर पडणार असल्याचा आशावाद आणि निर्धार डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लवकरच चांगले घडणार असल्याचे सूतोवाच  सावंत यांनी केले. 

मुलाखतीचे आज प्रक्षेपण
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ‘साम टीव्ही’चे डेप्युटी एडिटर राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली मुलाखत शनिवारी (ता. २७) संध्याकाळी ६ आणि रात्री ९ वाजता ‘साम टीव्ही’वर पाहता येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com