पणजीजवळ अपघातात 2 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

आज (मंगळवार) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार,शांतीनगर येथील चौपदरी महामार्गाच्या दुतर्फा अनेक अवजड वाहने पार्क करून ठेवली जातात.

पणजी : वास्को शांतीनगर येथील चौपदरी महामार्गाच्या एका कडेला पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या मागील बाजूला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.

आज (मंगळवार) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार,शांतीनगर येथील चौपदरी महामार्गाच्या दुतर्फा अनेक अवजड वाहने पार्क करून ठेवली जातात. पहाटे दोघेजण दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होते. तेव्हा जोरदार पाऊसही होता, त्यामुळे  दुचाकी चालकाला ट्रक पार्क करून ठेवल्याचे दिसून आले नाही, परिणामी त्याची जोरदार धडक ट्रकच्या मागील बाजूला बसली, यात दोघेही जण जागीच ठार झाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Goa news accident near Panaji 2 dead