बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आमदार चंद्रकांत कवळेकरांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन, पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला

पणजी, (गोवा): बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांना आज (गुरुवार) मडगाव न्यायालयाने अंतिरम अटकपूर्व जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे.

एसीबीने त्यांना समन्स पाठवून गेल्या सोमवारी 5 फेब्रुवारीला चौकशीला हजर राहण्यात सांगितले होते मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यांनी ही चौकशी अधिवेशनामुळे 22 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्याला एसीबीने काहीच उत्तर न देता नव्याने समन्स बजावून उद्या 9 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले होते. त्यामुळे आमदार कवळेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: goa news congress mla chandrakant kavlekar court