गोवा विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा घेराव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

शनिवारी गोवा भेटीवर आले असता अमित शहा यांच्या स्वागतावेळी विमानतळावरच त्यांनी नेते, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले होते. या प्रकाराचा काँग्रेसने तसेच राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी निषेध केला होता.

पणजी - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वास्को विमानतळ आवारात सभा घेतल्याचा मुद्दा वादग्रस्त झाला असून, या प्रकरणी गोव्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळ संचालकांना आज (सोमवाऱ) घेराव घालून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

शनिवारी गोवा भेटीवर आले असता अमित शहा यांच्या स्वागतावेळी विमानतळावरच त्यांनी नेते, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले होते. या प्रकाराचा काँग्रेसने तसेच राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी निषेध केला होता. 

काँग्रेसने भाजप आणि शहा यांच्या विरोधात विमानतळ प्राधिकरणाने एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली आहे.

Web Title: Goa news Congress protest against airport authority