'पोलिसांच्या आशिर्वादानेच गोव्यात मिळतात अमली पदार्थ'

police
police

पणजी : पोलिसांच्या आशिर्वादानेच गोव्यात अमली पदार्थ मिळतात, असा जाहीर आरोप गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो आणि नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी केल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

लोबो हे भाजपचे आमदार असून सरदेसाई हे भाजप सरकारमध्ये सहभागी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आहेत. राजकीयदृष्टया हा विषय अडचणीचा ठरणार असे स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पोलिस महासंचालक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अमली पदार्थ व्यवहाराचा कणा मोडा असा आदेश दिला होता. त्यानंतर ही कारवाई सुरु झाली आहे.

अमली पदार्थांच्या अतीसेवनानंतर 2 पर्यटकांच्या झालेल्या मृत्यूनंतर सरकार आणि पोलिसांनी या व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. हणजुणे पोलिसांनी धडक कारवाई करत हणजुणे येथील 2 बड्या क्लब मालकांना अटक करून अमली पदार्थ व्यवसायत गुंतलेल्यांची गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
केरळमधील जो रेमोन या युवकाकडून एनवायईएक्स क्लबमधून 40 हजार रूपयांचे अमली पदार्थ सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीच शिवाय अमली पदार्थ व्यवसायाला थारा देत असल्याबद्दल कर्लिस क्लबचा मालक एडवीन नूनीस आणि एनवायईएक्स क्लबचा मालक रोहन शेट्टी या दोघांना गजाआड़ करून ड्रग्स व्यवसायात गुंतलेल्याना कडक संदेश पोलिसांनी दिला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com