गुंतवणूक प्रोत्साहन मंडळावरून गोवा विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पणजी (गोवा): गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये मोठा घोटाळा असून त्याची चौकशी सभागृह समिती स्थापन करून करावी, अशी मागणी करत विरोधी पक्ष काँग्रेसने आज (सोमवार) सभात्याग केला. विरोधकांची सभागृह समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी फेटाळून लावल्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.

या संदर्भातील विषय आमदार रवी नाईक यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, वादग्रस्त ठरलेल्या वाणी एग्रोचा विषय स्थगित ठेवण्यात आलेला आहे. त्याशिवाय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मान्यता दिलेल्या सर्व 151 प्रकल्पांचा फेराआढावा घेण्यात आला आहे. 90 प्रकल्प जवळपास पूर्ण झाले असून 10 ते 15 प्रकल्प अधिक काळजी पूर्वक पड़ताळून बघितले जात असल्याची माहिती पर्रिकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहाच्या हौदात धाव घेतली. त्याच बरोबर विरोधी पक्षाच्या आमदरांनी सभात्याग केला.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: goa news Goa Legislative Assembly and politics