हेलिकॉप्टरच्या साह्याने तटरक्षक दलाने केली चारजणांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

हेलिकॉप्टरच्या साह्याने चारजणांची सुटका करण्यात आली.

पणजी - गोव्याची राजधानी पणजीच्या समुद्रकिनाऱ्यालगत एका जहाजात चार आपत्तीग्रस्त कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले. त्यापैकी एकाच्या हाताला जखम झाली आहे. 

तटरक्षक दलाच्या वतीने आज सकाळी ही कामगिरी करण्यात आली. काल (शनिवार) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोर्ट येथील उपकप्तान यांनी सुटका करण्यासंदर्भात तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात दूरध्वनीवरून विनंती केली होती. एका कर्मचाऱ्याच्या हाताला गंभीर इजा झाली होती, तर इतर तीनजणांना समुद्रातील रहिवासाचा त्रास होत होता. दरम्यान, इतर कर्मचारी वर्गाची प्रकृती स्थिर होती.

सूर्योदय होताच तटरक्षक दलाने सकाळी लवकरच एक हेलिकॉप्टर मदतीसाठी रवाना केले. कमांडंट अमित कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली हेलिकॉप्टरच्या साह्याने चारजणांची सुटका करण्यात आली. त्यांना मिरामार बीचवर वैद्यकीय पथकाकडे नेण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: goa news indian coast guard saves four personnel