नाविका सागर परिक्रमा: स्टॅनले बंदरातून तारिणी निघाली

ins tarini
ins tarini

पणजी (गोवा): आयएनएस तारिणी रविवारी (ता. 4) स्टॅनले बंदरातून दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनकडे निघाली. जगप्रदक्षिणेवर निघालेली आयएनएस तारिणी ही 21 जानेवारी 2018 रोजी स्टॅनले बंदरात दाखल झाली होती.

सर्व महिला अधिकारी असलेल्या या मोहिमेची सुरुवात गोव्यातून ऑगस्ट २०१७ मध्ये झाली आहे. याचे नेतृत्व लेफ्ट कमांडर वर्तिका जोशी करत असून, लेफ्ट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती आणि लेफ्टनंट एस. विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता यांचा यात समावेश आहे.

फॉकलंड द्विपसमूहांचे गव्हर्नर नायजेल फिलिप्त यांनी स्टॅनले बंदरात तारिणीचे स्वागत केले.

या वास्तव्यादरम्यान तारिणीच्या चमूने शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 1982 मधील उठावाशी संबंधित स्थळांनाही त्यांनी भेट दिली. आयएनएस तारिणी नियोजित वेळापत्रकानुसार 8 मार्चला केप टाऊनला पोहोचेल. तेथून गोव्याकडे येण्यास निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com