पणजी: धार्मिक प्रतीके मोडतोड प्रकरणी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

कुडतरी येथे आणखी एक तोडफोड करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले आहे. त्याने तोडफोड केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस पथक परेरा याच्या घराची झड़ती घेत असून पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे.

पणजी : दक्षिण गोव्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या तोडफोड़ प्रकरणाचा गुंता अखेरीस सुटला. गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने पहाटे पाठलाग करून कुडचडे येथील फ्रांसिस परेरा याला पकडले. तो टॅक्सी चालक आहे.

कुडतरी येथे आणखी एक तोडफोड करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले आहे. त्याने तोडफोड केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस पथक परेरा याच्या घराची झड़ती घेत असून पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. दक्षिण गोव्यात मोडतोड़ीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवून देखील समाजकंटक हाती लागत नसल्याने लोकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर कुडचड्यात दाखल झाले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: goa news panaji spititual statue issue