गोव्यात दोन क्रॉसची तोडफोड; संशयितांचे पोलिसांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पणजी: गोव्यात धार्मिक स्थळांच्या प्रतिकांची व क्रॉसची तोडफोड प्रकरणाचा शोध लावण्यास पोलिस यंत्रणा सक्रीय झाली असताना आज (गुरुवार) पहाटे लोटली येथील परिसरात आणखी दोन पवित्र क्रॉसची तोडफोड करण्यात आली. हे तोडफोडीचे प्रकार घडविणाऱ्या संशयितांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

दक्षिण गोव्यात पोलिस गस्ती वाढविण्यात आली असताना तसेच आयआरबी बटालियनच्या चार प्लाटून तैनात करूनही पुन्हा ही घटना घडल्याने पोलिस अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. काँग्रेसने हे प्रकार संवेदनशील असल्याने तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे तर सरकारमध्ये असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज नसून, गोवा पोलिस याचा छडा लावण्यात सक्षम असल्याचा दावा केला आहे.

भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी या तोडफोडीमध्ये प्ररप्रांतीयांचा हात असल्याने ते सीबीआयकडे देण्याचे मत व्यक्त केले आहे. पंधरा दिवस होत आले तरी अजूनही पोलिसांना या प्रकरणाचे काहीच धागेदारे हाती लागलेले नाहीत, त्यामुळे दक्षिण गोव्यात ख्रिस्ती बांधवामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: goa news Two Cross Crusade