गोव्यात जायचंय? तर मग ही बातमी वाचाच!

Goa_Tourism
Goa_Tourism

पणजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने आता बहुतांश व्यवहार सुरु झाले आहेत. त्यानंतर पर्यटनासाठी महत्त्वाचे स्थळ मानले जाणारे गोवा आता सुरु होत आहे. 

लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. मात्र, आता यामध्ये काही प्रमाणात सूट दिली जात आहे. त्यानंतर आता अनेक व्यवहार सुरु होत आहे. तसेच आता गोवाही पर्यटनासाठी खुला होत आहे. गोव्यात आता पर्यटक येऊ लागल्यानंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना राज्यात येण्याविषयीच्या नियम व अटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याच्या सीमेवरील प्रवेश मार्गावर ही सुविधा उपलब्ध असेल. त्याचठिकाणी येणाऱ्या व्यक्तीकडे 48 तासांत आरोग्य तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. तपासणी केली नसल्यास त्याला थेट हॉटेलमध्ये पाठविले जाईल. तेथून त्याची तपासणी होईल. तपासणीनंतर त्याचा अहवाल निगेटिव्‍ह आल्यानंतरच त्या व्यक्तीला बाहेर फिरता येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली. 

आरोग्य तपासणी गरजेचीच

जर एखादी व्यक्ती बाहेरून येत असेल तर संबंधित व्यक्तीने 48 तासात आरोग्य तपासणी केलेली नसेल, तर ती करून घेणे आवश्‍यक आहे. तसेच संबंधित पर्यटकांचे हॉटेल आरक्षण झालेले असावे. जर हॉटेलचे आरक्षण केलेले नसेल, तर त्याला प्रवेश मिळणार नाही. तसेच या ठिकाणी त्या व्यक्तीचे घर असणे, किंवा लगतचे पाहुणे असणे गरजेचे आहे. पर्यटन खात्याकडे जी २५० हॉटेल नोंदणी झाली आहे, त्या हॉटेलमध्ये आरक्षण केलेले असणे गरजेचे आहे.

माहिती देणारा अर्ज आवश्यक

हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पर्यटकास परिपूर्ण माहिती असलेला अर्ज भरावा लागणार आहे. कायदेशीररीत्या सर्व पद्धती लागू केल्या जाणार आहेत. बार ॲण्ड रेस्टॉरंट सुरू व्हावेत, असे आपणास वाटते. गोव्यात किनारे आणि मद्याला लागून पर्यटक येतात, हे मान्य आहे, असेही आजगावकर यांनी नमूद केले.

पर्यटकांना आता कायदेशीर परवानगी

गोव्यात यायचे झाल्यास पर्यटकांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे. हॉटेलच्‍या आरक्षणाची नोंद खात्याकडे आल्यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होणार आहे, हे पटवून देताना आजगावकर म्हणाले की, ज्या हॉटेल व्यावसायिकाला हॉटेल सुरू करावयाचे आहे, त्यांनी पर्यटन खात्याची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com