गोव्यात 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त'चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

गोवा मनोरंजन संस्था (इएसजी), सिनेफाईल क्‍लब आणि अनिल काणे यांच्या संयुक्‍त विद्यमानाने 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पणजी : गोवा मनोरंजन संस्था (इएसजी), सिनेफाईल क्‍लब आणि अनिल काणे यांच्या संयुक्‍त विद्यमानाने 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा कार्यक्रम 5 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता मॅकेनिज पॅलेस, पणजी येथे होणार असून, हा कार्यक्रम दृकश्राव्य असणार असल्याची माहिती इएसजीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतातील प्रतिभावंत चित्रपट निर्माते गुरू दत्त यांच्या बाजी (1951) ते साहेब, बिवी और गुलाम (1962) पर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांच्या स्लाईड्‌स, दृष्ये आणि गीते या कार्यक्रमात असतील.

मनोहर अय्यर हे गुरू दत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर माहिती देणार आहेत. या कार्यक्रम मनोरंजनात्मक नसून माहितीपर असल्याचेही यावेळी तालक म्हणाले. 

Web Title: Goa Organised Grey Dusk of Gurudatt