गोवा सज्ज; चोख सुरक्षाव्यवस्था 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पणजी : नववर्ष साजरे करण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात आले असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतुकीवरील नियंत्रणासाठी गोवा पोलिस सज्ज झाले आहेत. सुमारे दोन हजार जिल्हा पोलिस, तर सुमारे दीड हजार वाहतूक पोलिस उद्याच्या (ता. 31) नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी तैनात करण्यात आले आहेत. उत्तर गोव्यात समुद्रकिनारी परिसरातील रस्त्याच्या बाजूला वाहन पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. 
नववर्ष साजरे करण्यासाठी राज्यात देशी पर्यटक वाहने घेऊन आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी समुद्रकिनारी परिसरात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी आराखडा तयार केला आहे.

अधिक तर पर्यटक हे कळंगुट, बागा, हणजूण व हरमल समुद्रकिनारी गर्दी करीत असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. उत्तर गोव्यात सुमारे एक हजार 200 वाहतूक पोलिस, तीन "आयआरबी'च्या प्लाटून; तर दक्षिण गोव्यात 200 पोलिस व चार "आयआरबी'च्या प्लाटून तैनात आहेत. समुद्रकिनारी नजर ठेवण्यासाठी गणवेश तसेच साध्या पोलिसांची वर्णी लावण्यात आली आहे. कळंगुट समुद्रकिनारा सर्वांत मोठा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला. 
समुद्रकिनारी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटरमध्ये रस्त्याच्या बाजूने वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कळंगुट येथील सेंट अँथनी चॅपेल येथील रस्ता उद्या रात्रीसाठी दुतर्फाऐवजी एकतर्फी करण्यात आला आहे. चारचाकी वाहनांना समुद्रकिनाऱ्याकडून जाणाऱ्या रस्त्यावरून बागा येथे जाण्यास परवानगी दिली जाईल. मात्र, पार्किंग करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कळंगुट चर्च येथे पार्किंगची व्यवस्था आहे. उद्या संगीत नृत्यरजनीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी आहेत. त्यांना रात्री बारापर्यंतच संगीत वाजवण्यास परवानगी असेल. मात्र, हॉटेल व रेस्टॉरंट्‌समधील पार्ट्यांना हा नियम लागू होणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Goa is ready for new year celebration